मराठा समाजाने आंदोलन करू नये हे सांगण्याचा नैतिक अधिकार सरकारला नाही : नारायण राणे

Narayan Rane-Uddhav Thackeray

मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवड्यात स्थगिती दिल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. “सरकार ऐकत नाही तेव्हा आंदोलन करायचे असते. सरकार खंबीरपणे, ठामपणे तुमच्यासोबत आहे. कोणताही पक्ष आरक्षणाविरोधात बोलत नाही. ” असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा आंदोलन न करण्याचे आवाहन केले. यावरून भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सरकारवर टीका केली आहे.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले त्यातला एक ब्राम्हण तर दुसरा मराठा : संजय राऊत   

“समाजाने आंदोलन करू नये, हे सांगण्याचा नैतिक अधिकार राज्य सरकारला उरला नाही. अन्याय झाल्यास त्याविरोधात आवाज उचलण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिला आहे. मराठा समाजाने आतापर्यंत संयम बाळगला, आता मात्र तसे होणार नाही. ” असे मत राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER