शिवसेनेमुळेच नारायण राणे मैदानात आले आहे : गुलाबराव पाटील

Narayan Rane - Gulabrao Patil

मुंबई :- शिवसेना (Shiv Sena) लपत नाही, मैदानात असते. शिवसेनेमुळेच नारायण राणे मैदानात आले आहे. जर शिवसेना लपत आली असती तर ते कोकणात काहीतरी इतर कामे करत बसले असते”, अशा शब्दात शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजप (BJP) खासदार नारायण राणेंवर (Narayan Rane) घणाघात केला आहे.

दिल्लीतील शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी शिवसेना सहभागी झाली नव्हती. याच मुद्यावरून भाजप खासदार नारायण राणेंनी सेनेला फटकारलं आहे. शिवसेना ही मागून असते. ते अंडरग्राऊंड असतात. मातोश्रीवरून बटण दाबलं की रस्त्यावर आलो. शिवसेना सगळं बटण दाबून करतात. मातोश्रीची सुरक्षा कडक केली आहे. त्यासाठी मातोश्रीला जाळ्या लावल्यात, अशा मिश्कील टोला नारायण राणेंनी लगावला होता. त्यालाच आता गुलाबराव पाटील यांनी जळगावात प्रत्युत्तर दिले.

तसेच युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना दिलेल्या सुरक्षेवरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या टीकेचा ही गुलाबराव यांनी यावेळी समाचार घेतला. कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला राज्य शासन सुरक्षा देत नाही, त्यासाठी असलेली सुरक्षा कमिटी ती सुरक्षा प्रदान करते, त्यामुळे विनाकारण चुकीचे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER