भाजप दुर्लक्ष करत असल्याने नारायण राणे वैफल्यग्रस्त; वैभव नाईकांचा पलटवार

Narayan Rane - Vaibhav Naik

सिंधुदुर्ग : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोकणाचा दौरा केल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. निलेश राणेंनी (Nilesh Rane) शिवसेनेचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी थेट नारायण राणेंनाच (Narayan Rane) लक्ष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस कोकणात आले, मात्र त्यांच्या दौ-यापासून राणेंना दूर ठेवण्यात आल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. केवळ राजकीय द्वेषापोटी नारायण राणे उद्धव ठाकरेंवर टीका करत वैभव नाईक यांनी नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले.

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच तौक्ते चक्रीवादळाची नुकसान भरपाई देणार. मात्र केंद्राकडून किती मदत मिळाली याचा राणेंनी विचार करावा. भाजप आणि लोक नारायण राणेंची किंमत करत नाही म्हणून राणे वैफल्यग्रस्त झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button