महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणे यांची मागणी

Narayan Rane

रत्नागिरी/प्रतिनिधी :- ‘ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी’, अशी मागणी भाजप खा. नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली. हे सरकार लोकांचा जीव वाचवण्यास, उदरनिर्वाह करण्यास सक्षम नाही, असा हल्लाबोल राणेंनी केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. कोरोनामुळे राज्यावर गहिरं संकट आहे, असं नारायण राणे म्हणाले. आतापर्यंत जे काही दिलंय ते केंद्र सरकारने दिलं आहे. हे कुठल्या प्रकारचे राजकारण आहे हे न समजण्यापलिकडे आहे. या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना संरक्षित कसं ठेवावं याचा अभ्यास नाही. त्यामुळे असा कारभार सुरु आहे, असंही राणे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पवारांपाठोपाठ नारायण राणेही राज्यपालांच्या भेटीला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER