कुटुंबाला सांभाळू न शकणारे महाराष्ट्राला काय सांभाळणार? नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच मुद्द्यावरून भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री स्वत:च्या कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत, ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? अशा बोचऱ्या शब्दात राणेंनी टीका केली. राज्याची कोरोना परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार कमी पडलं, असाही टोला राणे यांनी लगावला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

नारायण राणे नेमके काय म्हणाले?

राज्यात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय कमी आहेत. याबद्दल राज्य सरकार केंद्राला टार्गेट करत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पण उपाययोजना करायला महाराष्ट्र कमी पडत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या जी वाढत आहे त्याचं गांभीर्य राज्य सरकारला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) केंद्राकडे बोट दाखवत आहेत. याशिवाय त्यांनी बाकी जी कारणं सांगितली आहेत, डॉक्टर नर्सेस नाहीत, पण ही कुणाची जबाबदारी आहे? जशी  माझे कुटुंब माझी जबाबदारी, महाराष्ट्र जर तुमचं कुटुंब असेल तर या सगळ्या गोष्टी उपलब्ध करणं, रुग्णांवर योग्यरीत्या उपचार करणं, त्यांना ठणठणीत करणं ही तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात का जाऊन बसताय? मातोश्रीच्या बाहेर पडत नाही. कोरोना होईल कसा? जी  व्यक्ती कुटुंबाला सांभाळू शकत नाही ती व्यक्ती महाराष्ट्राला कसं सांभाळणार? कोरोना हाताळायला हे सरकार कमी पडलं आहे. केंद्राकडे का बोट दाखवता, असे म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

सचिन वाझेला मुंबईतून फक्त १०० कोटी जमा करायला सांगितले. हे आदेश फक्त अनिल देशमुखांचे नाहीत. राज्यातील सर्व मोठ्या नेत्यांचे हे आदेश आहेत. मग तुम्ही हे जमा केलेले पैसे लसीसाठी का नाही वापरत? ते पैसे कुठे जातात? कुणाकडे जातात? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.

एपीआय सचिन वाझे याला १०० कोटी रुपये जमा करायला लावले. हे आदेश फक्त अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे नाहीत. हे जमा केलेले पैसै लसीसाठी का वापरत नाहीत? हे पैसै कोणाकडे जात आहेत? ते पैसै कोरोनासाठी वापरा की, असा सल्लासुद्धा नारायण राणे यांनी सरकारला दिला. तसेच बेड नाहीत, व्हेंडिलेटर नाही, वॉर्डबॉय नाही, यांची पदे कोण भरणार? रत्नागिरीमध्ये आरोग्य विभागाला ३५७ पदं पाहिजेत.  सध्या फक्त १११ पदं भरली आहेत. सिंधुदुर्गमध्ये ३१६ पदं रिक्त आहेत. ही पदं का भरली नाहीत? वर्षभरात ५४ हजार रुग्ण दगावले. या सर्व मृत्यूला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका राणे यांनी राज्य सरकारवर केली.

माझ्या रुग्णालायात एकही जागा रिक्त नाही. एवढे पैसे आले यामध्ये एखादं रुग्णालय बांधलं का, एवढं मोठं कलेक्शन असताना एकही अशी सुविधा का केली नाही, असा प्रश्न राणे यांनी केला. राज्य सरकार केंद्र सरकारकडे का बोट दाखवत आहे? केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार आपलं अपयश झाकण्याचा  प्रयत्न करत आहे. एकही मंत्री आपलं काम पूर्ण करताना दिसत नाही. काम न करता कंत्राटदारांना पैसे दिले जात आहे. दीड-दोन वर्षे जी बचत केली आहे, ती काढा आणि ती बेड, लसीकरण यासाठी वापरा, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

ही बातमी पण वाचा : निवडणुका असणाऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला – मनसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button