मंत्रालयात बसू शकत नाही, तो मुख्यमंत्री कशाला हवा – नारायण राणे

Narayan Rane-CM uddhav Thackeray

मुंबई :- जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे, असा घणाघात भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मुख्यमंत्री आणि आघाडी सरकार निष्क्रिय असल्याचे म्हटले आहे.

तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री मंत्रायलयात गेले नाही. हाकेच्या अंतरावर मंत्रालय आहे. मात्र मुख्यमंत्री मंत्रालयात फिरकलेच नाहीत, सरकार अस्तित्वात आहे की नाही? हे कळत नाही, केवळ मातोश्रीच्या बिळात लपून बसलेला आहे. तो काय काम करणार, तो मुख्यमंत्री कशाला हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदावर राहण्याचा अधिकार गमावला आहे.

ही बातमी पण वाचा : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची माहिती न दिल्याने मुख्यमंत्र्यांनी त्या रद्द केल्या – फडणवीस

महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, मंत्रालय नाही, सामान्य माणसाची कुणाला चिंता नाही, बदल्या कोण करतंय कळत नाही, ताळमेळ नाही, काय चाललंय काही समजत नाही. महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू, त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही, हा मुख्यमंत्री प्रशासन चालवू शकत नाही. जनतेची परिस्थिती थांबवू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे सरकार घातक आहे. महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू होत आहे. त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही. त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. अशी माहितीही राणे यांनी यावेळी दिली.

महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या लढ्यात अपयशी ठरली आहे. कोणाचा कोनासोबतच ताळमेळ असल्याचे दिसून येत नाही. कोरोनामुळे मुंबईत जवळपास ५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर सरकार खरच गंभीर आहे का ? बदल्याची प्रकरणावर मात्र तात्काळ बैठका होतात. झालेल्या बदल्या तात्काळ रद्द होतात. गेल्या चार महिन्यात हे सरकार १० वर्ष मागे नेलं. अनेकांचे पगार होत नाही. निसर्ग चक्रीवादळ झालं, पण मुख्यमंत्र्यांनी केवळ घोषणा केल्या. पुढे काय झालं? राज्याला ना मुख्यमंत्री आहे ना मंत्रालय अशीही टीका राणेंनी केली.

ही बातमी पण वाचा : आक्रमक मुख्यमंत्री उद्धव यांनी गृहखात्यातील बदल्या रद्द करविल्या का ?

मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढपूरात जाऊन वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याची टीका राणे यांनी केली. यंदाच्या वर्षी आषाढीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या शासकीय महापूजेवरही याचं सावट पाहायला मिळालं. खुद्द पंढरपूरातील स्थानिकांनाही या दिवशी मंदिरप्रवेश नाकारण्यात आला. यावरच टीका करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली.

‘मुख्यमंत्री पंढरपूरात गेले. शासकीय महापूजेचा मान असतो त्यांचा. पण, यांची काय केलं, दर्शन घेतलं का? विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायांना हात लावला का? गंध लावलं, हार घातला का? नैवेद्य घेतला का, हा तर वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. हे मुख्यमंत्री आहेत ना, हिंदू आहेत ना?’, या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. पंढरपूरात एकाही व्यक्तीला मंदिरात जाऊ दिल्ं नाही, एकाही स्थानिक शिवसैनिकाला ते भेटले नाहीत ही बाब अधोरेखित करत, पिंजऱ्यातच करायची होती तर मग मातोश्रीवरच विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करायची होती. मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या पूजेलाच महत्त्वं दिलं नसल्याचं म्हणच आता जनतेच्या प्रश्नाला वाली राहिलेला नाही असा ऩाराजीचा सूर राणेंनी आळवला.

यावेळी त्यांनी मंदिरात गरम होतं म्हणून कारमध्ये येऊन बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे तर, चार पावलं पुढे असल्याचं म्हणत त्यांचाही समाचार घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER