नारदा घोटाळा : तृणमूलच्या नेत्यांविरूद्ध खटला चालवण्यास राज्यपालांची मंजुरी

Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़(Jagdeep Dhankhar) यांनी नारदा घोटाळ्याप्रकरणी तृणमूल कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांविरोधात खटला चालवण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे टीएमसी(TMC) नेत्यांच्या आणि राज्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

तृणमूल कॉंग्रेसचे माजी मंत्री आणि उच्च पदाधिकारी फरहद हकीम, सुब्रतa मुखर्जी, मदन मित्रा आणि सोव्हान चटर्जी यांच्या खटल्यास मान्यता दिली आहे. सीबीआयने याची चौकशी केली आहे. राजभवनने याविषयी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.

राज्यपालांनी मुखर्जी, मदन, मित्र आणि सौवन चटर्जी यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी परवानगी दिली आहे. हे सर्वजण गुन्ह्याच्या वेळी पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्री होते.

राजभवनने म्हटले आहे की, सीबीआयने पश्चिम बंगालच्या राज्यपालांना यासंदर्भात विनंती केली होती या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे उपलब्ध करुन दिली होती.

राज्यपालानी कलम १६३ आणि १६४ अंतर्गत अधिकारांचा वापर केला आहे. या अधिकाराअंतर्गत त्यांनी मंत्र्यांविरोधात खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button