नाओमी ओसोकाची फ्रेंच ओपनमधून माघार

Naomi osaka not to play in French Open

यंदाची युएस ओपन (US Open) विजेती नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिने फ्रेंच ओपन (French Open) टेनिस स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मे महिन्यापासून पुढे ढकलण्यात आलेली ही स्पर्धा आता 27 सप्टेंबरपासून खेळली जाणार आहे. ओसाकाने काही दिवसांपूर्वीच व्हिक्टोरिया अझारेंकाला मात देत युएस ओपन स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली आहे. यासह जागतिक क्रमवारीत ती तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे.

आपला निर्णय व्टिटरवर जाहीर करताना ओसाकाने म्हटलेय की, तिच्या पायाची नडगी दुखावली आहे. त्यामुळे अगदीच कमी वेळात क्ले कोर्टवरच्या या दमछाक करणाऱ्या स्पर्धेसाठी तयार होणे शक्य नाही. त्यामुळे मी यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये खेळू शकणार नाही. या दोन स्पर्धांमधील कालावधी यंदा फारच कमी आहे.

याआधी विद्यमान विजेती आॕस्ट्रेलियन खेळाडू अॕशली बार्टी हिनेसुध्दा या स्पर्धेत न खेळायचे जाहीर केलेले आहे. तिने मात्र कोविड-19 मुळे आरोग्याच्या सुरक्षेचे कारण दिले आहे. या स्पर्धेला मर्यादीत प्रमाणात प्रेक्षकांना प्रवेश देणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केल्यावर बार्टीने हा निर्णय घेतला होता. सेरेना विल्यम्सने आपल्या सहभागाबद्दल भूमिका स्पष्ट केलेली नाही.

पुरुषांमध्ये राॕजर फेडरर गुडघ्यावरील शस्रक्रियेमुळे सहभागी होणार नाही पण राफेल नदाल व जोकोवीच सहभागी होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER