अनेकांना कोरोना होऊन गेला, आता अँटी बॉडी’ टेस्टवर जोर द्या, नांदगावकर यांची मागणी

Bala Nandgaonkar

मुंबई : राज्यात अनेक लोकांना कोरोना (Corona) होऊन गेला, हे त्यांच्या लक्षातही आलं नाही, अशी माहिती विविध सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आता संपूर्ण राज्यात ‘अँटी बॉडी’ टेस्ट करण्यावर जोर द्यावा, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी ट्वीट करून राज्य सरकारला विनंती केली आहे की, की आता पूर्ण राज्यात “अँटी बॉडी” टेस्ट करण्यावर जोर दयावा. करण्यात आलेल्या अनेक सर्व्हेक्षणातून हे समोर आले आहे की मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोना ची लागण होऊन सुद्धा गेली व ती अनेकांच्या लक्षात देखील आली नाही. त्यामुळे अशा टेस्ट द्वारे एकूण लोकसंख्येच्या मोठ्या हिस्स्या ने ज्याने कोरोना वर मात केली ते आपल्या लक्षात येईल व अशा लोकांना घरात थांबण्याची काहीच आवश्यकता नाही.

ही लोक कोरोनाचा प्रसार देखील करीत नाहीत त्यामुळे अशा लोकांना त्यांची कामे पूर्वीप्रमाणे करून देण्याची मुभा दिल्यास अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास खुप मोठी मदत होईल. तसेच खासगी लॅब चालकांना “अँटी बॉडी” चे दर जे सध्या जवळपास हजार रुपये आहेत ते कमी करण्याचे निर्देश दिल्यास अनेक लोक स्वतःहून सुद्धा ती टेस्ट करवून घेतील व यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात पूर्वपदावर येण्यास मदत होईल. असं बाळा नांदगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER