लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका; वीज बिल वसुलीवरून मनसे आक्रमक

मुंबई : मनसेचे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आज पुन्हा एकदा वीज बिल, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकार आणि शिवसेनेला लक्ष्य केले आहे. महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना वीज बिल (electricity-bill-issue) भरलं नाही तर वीज खंडित करण्याचा इशारा दिला आहे. सरकारकडून एका बाजूला वीज बील माफ करण्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. ऊर्जामंत्री गोड बातमी देऊ असं म्हणतात. १०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊ असं सागतात. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आलेले नाही.

हे लोकांचे दुश्मन आहेत हे जनतेला कळलं पाहिजे, असं नांदगावकर म्हणाले. वीज बिलाचा भरणा केला नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याचा हा निर्णय तुघलकी आहे. या सरकारला लोकांनी निश्चितपणे अंधारात ढकलायला पाहिजे. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आल्याचं दाखवतं आहे मात्र ते तीन पक्षांच्या भल्यासाठी एकत्र आलेले आहे. जनतेने सरकारला गाडून  टाकावं, असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी केले. मनसे वीज बिलप्रश्नी रस्त्यावर उतरली, आंदोलन केले, निवेदन दिले, हात जोडले, मनसेने वीज बिल प्रश्नी आणखी काय करायला पाहिजे, असा सवाल नांदगावकरांनी केला. हे सरकार लोकांना अंधारात ढकलणार असेल तर लोकांनीही राज्य सरकारला अंधारात ढकलायला तयार राहिलं पाहिजे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाची सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार आहे.  याविषयी बोलताना नांदगावकरांनी सरकार चालढकल करत असल्याचं म्हटलं. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करत आहे. वारंवार वेळ वाढवून का मागितली जात आहे? जर आरक्षण द्यायचंच आहे तर देऊन टाका, उगा टांगती तलवार ठेवू नका. मराठा समाजावर अन्याय का केला जात आहे, असा सवाल बाळा नांदगावकरांनी राज्य सरकारला केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता उरलेली नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवत शिवसेना बदलली असल्याचं सिद्ध झालं आहे. शिवसेनेचे हिंदुत्व आता बदलले  आहे, असेही नांदगावकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER