नांदेड: उत्तर नांदेड मधून महायुती कडून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नांदेंड :- शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार व महानगरपालिकेतील एकमेव शिवसेनेचे नगरसेवक बालाजी कल्याणकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ते नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून आपले नशिब आजमावनार आहेत.

आज त्यांनी अर्ज दाखल करतांना भव्य रॅली काढली. या रॅलीज भगव्या ध्वजांसह हजारे कार्यकर्ते व हितचिंतक सामिल झाले होते. नांदेड दक्षिण मतदार संघातून कालच सौ.राजश्री हेमंत पाटील यांनी प्रचंड जनसमुदायासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

त्यांच्या सोबत हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्यासह शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, उमेश मुंडे आदिंसह इतर शिवसेना सर्व पदाधिकारींची उपस्थिती होती.

ही बातमी पण वाचा : परभणी: जिल्हयात आज 50 उमेदवारांनी केले नामनिर्देशन पत्र दाखल