नांदेड: प्रा. अभिजीत आपस्तंब यांचे आकाशवाणीच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रमात शास्त्रीय गायन

नांदेड :- प्रतिनिधी- मूळचे नांदेड येथील असलेले आणि सध्या श्री श्री विद्यापीठ, कटक (ओरिसा) येथे संगीत विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले सुप्रसिद्ध युवा गायक, प्रा. अभिजीत रत्नाकर आपस्तंब यांना मागील वर्षी शास्त्रीय गायनात आकाशवाणीचा ’ए’ ग्रेड प्राप्त झाला.

त्यानिमित्ताने त्यांना अतिशय प्रतिष्ठित अश्या आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात शास्त्रीय गायनाची संधी मिळाली आहे. औरंगाबाद आकाशवाणी केंद्रात त्याचे ध्वनिमुद्रण झाले आहे. हा कार्यक्रम दि. 12 ऑक्टोबर, शनिवारी रात्री 9:30 ते 11 या वेळेस आकाशवाणीच्या भारतातील सर्व केंद्रातून सहक्षेपित करण्यात येईल. त्यांना तबल्यावर शोण पाटील आणि संवादिनीवर सुदर्शन धुतेकर यांनी साथसंगत केली आहे.