नांदेड: विरोधी पक्ष नेत्याच्या अनोख्या सेवा निवृत्ती निरोपाने सेवक गेला भाराऊन

नांदेड मनपा इतिहासातील पहिलीच घटना; तब्बल 33 वर्षे विरोधी पक्ष दालनात दिली शासकीय सेवा

विरोधी पक्ष नेत्याच्या अनोख्या सेवा निवृत्ती निरोपाने सेवक गेला भाराऊन

नांदेड :  सेवा निवृत्त झालेल्या आपल्या दालनातील सेवकाचा विरोधी पक्ष नेत्याने सन्मानपूर्वक निरोप दिला. विरोधी पक्ष नेत्याने सेवकाला आपल्या शासकीय गाडीत बसवून सन्मानपूर्वक निरोप दिला. रायशल राठोड असे या कर्मचार्‍यांचे नाव असून ते सेवानिवृत्त झाले. सेवा निवृत्ती निमित्य महापालिकेचे भाजपाचे विरोधी पक्ष नेता दिपकसिंह रावत आणि इतर कर्मचार्‍यांनी राठोड यांचा सत्कार केला. सुमारे 1987 पासून राठोड हे महापालिकेत कार्यरत आहेत, विशेष म्हणजे 1997 पासून ते आज पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेत्याच्या दालनात आपली सेवा बाजावली.

मुखेड: नागरिकत्वाशिवाय राज्य पूर्ण होऊ शकत नाही- प्रा.डॉ.आर.डी.शिंदे

आपल्या दालनातील सेवक निवृत्त होत असल्याने विरोधी पक्ष नेता दिपकसिह रावत यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्यांचा सन्मान केला. इतकच नाही तर रावत यांनी आपल्या सरकारी वाहनातून राठोड यांना सन्मानपूर्वक घरापर्यंत नेऊन सोडल. एखाद्या सेवक दर्जाच्या कर्मचार्‍याचा असा सन्मान करण्याची नांदेड महापालिकेतील ही पहिलीच घटना आहे.

या अनोख्या सेवा निवृत्ती निरोप समारंभाने सेवक रायशल राठोड हे पुरते भाराऊन गेले. एका सामान्य सेवकाप्रती नेत्यांनी व्यक्त केलेले प्रेम व विश्वास ते आपल्या डोळयात लपवू शकले नाही.