पाणी टंचाई उपाययोजनाकडे दुर्लक्ष करु नका -आ.डॉ. राठोड

खेड: अधिकारी-पदाधिका-यांना सक्त सुचना

Dr Rathod nanded

मुखेड: अ‍ॅड.आशिष कुलकर्णी – तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पाणी टंचाई भासणार नाही मात्र वाडी तांड्यावर नेहमी पाणीटंचाई असून अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी पाणीटंचाईकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पाणी टंचाई भासू देऊ नका अन्यथा कामचुकार करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आमदार तुषार राठोड यांनी मुखेड पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा बैठकीत केले. या बैठकीस बहुतांश सरपंच, उपसरपंच यांची उपस्थिती होती मात्र तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. तुषार राठोड यांची उपस्थिती होती. बैठकीस पंचायत समिती सभापती सौ. सविता पाटील खैरकेकर, नगराध्यक्ष बाबुुराव देबडवार,उपसभापती सौ.हरीबाई गोंड, तहसीलदार काशीनाथ पाटील, गटविकास अधिकारी कैलास बळवंत, प.सं सदस्य बालाजी पाटील सकनुरकर,प्रा.माधव मंदेवाड, राम गायकवाड, वसू पाटील येवतीकर, प.स.सदस्य नागनाथ कोटीवाले,नगरसेवक अशोक गजलवाड यांची उपस्थिती होती.

यावेळी आ.डॉ. तुषार राठोड यांनी सूचना केल्या की, गेल्या वर्षी तीव्र पाणीटंचाईच्या झळा होत्या. 207 अधिग्रहणाद्वारे व 60 टँकरद्वारे तालुक्याला पाणीपुरवठा करण्यात आला मात्र यावर्षी सुदैवाने चांगला पाऊस झाल्याने तलाव, नदी-नाले, यांना पुरेस पाणी आहे. परंतु; तालुक्यातील वाडी तांड्यावर दरवर्षीच पाणीटंचाई भासत असते त्यामुळे सरपंच आणि व ग्रामसेवकांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सज्ज राहावे. तालुक्यात मागील काळात 65 गावांना करोडो रुपयांच्या पाणीपुरवठ्याचे योजना कार्यान्वयीत झाल्या मात्र या कामात गैरव्यवहार झाल्याने योजना कुचकामी ठरल्या असून या गावात नेहमीच पाणीटंचाई असते त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करण्याची सूचना डॉ. तुषार राठोड यांनी करून ग्रामसेवकांनी अधिग्रहणाचे प्रस्ताव वेळीच प्रशासना करे सादर करावीत अन्यथा दिरंगाई करणा-यांवर कारवाई करण्याची सूचना करुन पाणीटंचाई बाबत अधिकारी व कर्मचारी गांभीर्याने घेऊन पाणीटंचाईवर मात करावी अन्यथा कामात कुचराई करणार्‍या वर कारवाई करण्याची सूचना आमदारांनी केली. या प्रसंगी तहसीलदार काशिनाथ पाटील, पंचायत समिती सभापती सौ. सविता पाटील खैरकेकर यांनीही सूचना मांडल्या. या बैठकीकडे सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी व काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्यांनीे पाठ फिरविली तर व्यासपीठावर बहुतांशी महिलांचे पतीच हजर होते. बैठकीचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांनी केले. बैठक यशस्वी करण्यासाठी संतोष मठपती , गजानन पेंडकर,वडजे आदिनी परिश्रम घेतले.