नांदेड: जुन्या कौठा भागात अवैध घातक शस्त्रसाठा जप्त

साठयात 27 बिनमुठी तलवारी, 2 खंजर

अवैध घातक शस्त्रसाठा जप्त

नांदेड( प्रतिनिधी): शहरातील जुना कौठा भागातील विकासनगर येथील एका आरोपीच्या राहत्या घरी विनापरवाना व बेकायदेशिर 27 लोखंडी मुठ नसलेल्या तलवारी व दोन लोखंडी खंजर असा घातक शस्त्रांचा साठा आढळला असून सदरील हा अवैध मुददेमाल नांदेड ग्रामीण पोलीसांनी 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6.50 दरम्यान छापा टाकून जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक आडे, विशेष पोलीस पथक यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं 57/2020 कलम 4/25 भाहका कायदया प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.