नांदेड-मुंबई नवीन रेल्वेगाडी लवकरच धावणार

नांदेड : प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची असलेली मागणी लक्षात घेता नांदेड येथून मुंबईला जाण्यासाठी लवकरच नांदेड मुुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनलसाठी नवीन रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे. याच बरोबर नांदेड नागपूर ही गाडी आठवड्यातून एक दिवस असून या गाडीला प्रवाशांनी जास्तीत जास्त पसंती देवून दैनंदिन गाडी सुरू होण्यासाठी प्रवाशांनी मदत करावे असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व्ही.के.यादव यांनी नांदेड दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलतांना म्हणाले. मुदखेड परभणीच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी गती देण्यासाठी प्रत्येक्ष पाहणी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व्ही.के.यादव हे नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी हि माहिती दिली.

सुरूवातीला यादव यांनी रेल्वे स्थानकावरील सुविधेची पाहणी करुन आढावा घेतला. डाक विभाग, उपहारगृह, प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या प्रतिक्षालयाची पाहणी याचबरोबर सुरक्षेच्या बाबतीचा आढावा या सर्व गोष्टी त्यांनी रेल्वे स्थानकांची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. परळी रेल्वे स्थाकनापासून पाहणी दौरा सुरू केला असून यामध्ये त्यांनी परळी , गंगाखेड, परभणी, पुर्णा या स्थानकांचीही पाहणी त्यांनी केली. यामध्ये गंगाखेड येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाची माहिती घेतली व लवकरच या पुलाचे काम सुरू केले जावून पुर्णत्त्वास नेले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेत त्यांनी व्यक्त केले. यामुळे गंगाखेड येथील पुल पुर्णत्त्वास जाणार असल्याचे सांगितले.

याचबरोबर नांदेड रेल्वे स्थानकांच्या विकासाठी रेल्वे प्रशासन कठीबध्द असून प्रवशांना जास्ती जास्त सुविधा देण्यासाठी रेल्वे विभाग तयार आहे. याच बरोबर नांदेड रेल्वे स्थानकावरुन नवीन गाड्या सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नांदेड मुंबई ही गाडी लवकरच सुरू होणार आहे. या गाडीला अकोला पुर्णा, लिंक जोडण्यात येणार असून अकोला भागातील प्रवाशांनाही मुंबईला जाण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुदखेड -परभणी या डबल लाईनचे काम येत्या दीड वर्षात म्हणजे डिसेंबर २०१८ पर्यंत पुर्ण करायचे आहे. पण याच्या अगोदर काम पुर्ण होईल का याचीही पाहणी सुरू आहे. दोन टप्प्यात काम असून पहिला टप्पा मार्च २०१८ त्यानंतरचा दुसरा टप्पा डिसेंबर २०१८ असा राहणार आहे.

नांदेड-नागपूर ही गाडी आठवड्यातून एक दिवस सध्या चालविली जात आहे. पण या गाडीला सध्या अत्यअल्प प्रतिसाद असून या गाडीला प्रवाश्यानी जास्ती जास्त पसंती देवून दैनंदिन गाडी सुरू करण्यासाठी मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नांदेड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ या ठिकाणी अधिक लांबची गाडी थांबू शकत नाही. यामुळे यावरही सुरूस्ती तसेच प्रवाशांना प्लॅटफार्म बदलण्यासाठी नवीन उडाण पुलाची आवश्‍यकता असून यासाठी लवकरच रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठून नवीन उडाण पुलाची मंजूरी घेवून काम सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.

जास्ती जास्ती नांदेडकरांना रेल्वेच्या सुविधा देण्यासाठी रेल्वे बोर्ड तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात नांदेड विभागासाठी निधी उपलब्ध झाला असून विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर उमरी, धर्माबाद व गंगाखेड येथील पणवेल व नगरसोल नर्सापूर या गाड्यांना थांबा देण्यासाठी विचाराधी असल्याचे सांगितले.