नांदेड: माता गुजरी जी.एन.आर.आय. टॉवरमुळे सम्रूध्दीत भर पडेल-परमज्योत सिंघ चाहेल

618 खोल्यांचा अकरा मजली यात्री निवास उभारणीसाठी प्रयत्न सुरू

Mata Gujri GNRI

नांदेड(प्रतिनिधी) :  देशविदेशातून येणा-या यात्रेकरूंच्या जिवावर बेतेल तो पर्यंत गप्प राहण्या एैवजी जुन्या आणि पडकी होण्याच्या मार्गावर असलेल्या महाराजा रणजितसिंघजी यांत्री निवासाच्या जागेवर 618 खोल्यांचा भव्य दिव्य असा माता गुजरी जी.एन.आर.आय. यात्री निवास उभारण्यासाठी गुरूव्दारा बोर्डाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्य प्रयत्नशिल असल्याचे बोर्डाचे समन्वयक सदस्य स.परमज्योत सिंघ चाहेल यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

गुरूव्दारा तख्त सचखंड बोर्ड संस्थेच्या दि.12 व 13 जून 2019 च्या दोन्ही बैठकीत बोर्डाचे अध्यक्ष सरदार भूपिंदर सिंघ मिन्हास यांनी जुनी झालेल्या आणि केव्हाही कोसळण्याची भिती असलेल्या महाराजा रणजितसिंघजी यात्री निवासाच्या जागी सर्व सुविधा असलेल्या नवीन आधुनिक अशा भव्य निवास बांधण्यासाठी सर्व बोर्ड सदस्यांसोबत चर्चा केली.तसेच अधून मधून नांदेड भेटीत देखील स्थानिक तसेच बाहेरील सदस्यांसोबत चर्चा करून संकल्पित परियोजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. आणि नविन इमारत बांधतेवेळी गुरूव्दाराच्या कोणत्याच ठेवी वापरावयाच्या नाहीत यावर देखील शिक्कामोर्तब करण्यात आले.

त्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष मिनहास यांनी जुन्या इमारतीचा सर्वे करून बिल्डिंग वापरण्यायोग्य आहे काय या विषयी तांत्रिक अहवाल मागविला आणि त्यावरून स्पष्ट झाले की, जुनी इमारत धोकादायक झालेली आहे. छत, भिंत, बीम कोसळून भाविकांच्या जीवावर एखादा अप्रिय प्रसंग उत्भवू शकतो.

वरील विषयाची काळजी घेत गुरूव्दारा बोर्ड अध्यक्ष या नात्याने भाविकांच्या जीवाचे रक्षण या विषयी पाऊले उचलने खूपच गरजेचे झाले होते. त्यामुळे नव्या इमारतीच्या संकल्पनेस पुढे मांडण्यात आले. या अहवालाचे निकष गंभीरतेने घेवून त्यानुसारच मुंबई मध्ये दि.16 जानेवारी 2020 रोजी पार पडलेल्या गुरूव्दारा सदस्यांच्या बैठकीत देखील वरील विषयी चर्चा करण्यात आली.

या अनुषंगाने चाहेल यांनी निवेदनात नमुद केले आहे की, वरील इमारत भव्य आणि दिव्य अशी अकरा मजली निवास खोल्या असलेली होणार असून त्यात सर्व सुविधांयुक्त 618 खोल्चा आहेत. एकूण आठ लिफट व 8 हजार स्क्वे.फुटांचा भाव कार्यक्रम दालन बांधण्यात येणार आहे.तसेच हेरिटेज आणि कल्चरल साहित्याचे शॉपिंग कॉम्प्लेक्स यात सामाविष्ट असेल. यात आधुनिक प्रणालीची जिमही असेल. या सह इतर सुविधाही सामाविष्ट असणार आहेत.या भव्यदिव्य इमारतीचे बांधकाम करण्यासाठी दानशूर व्यक्तींकडून मदत घेण्याची योजना आहे. सध्या अकरा खोल्यांसाठी बुकिंग झालेले आहे.पुढे देखिल 618 खोल्यांसाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येईल.

वरील इमारत गुरूव्दाराच्या वैभवात भर टाकणारी असल्याने नांदेड मधील शिख समाजाने सकारात्मक भुमिका दाखविली आहे असे शेवटी चहेल यांनी सांगितले.