नांदेड: पतंजली योगासन स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद; 79 स्पर्धकांचा सहभाग

18 फेब्रुवारी रोजी राज्यपातळीवर होणार स्पधा; 18 जिल्हयातील 300 स्पर्धकांचा होणार सहभाग

पतंजली योगासन स्पर्धे

नांदेड :  प्रतिनिधी-पतंजली योग परिवारातर्फे आयोजित, योग सोसायटी नांदेड अंतर्गत 9 ते 25 वयोगटातील मुला मुलींचा योगासन स्पर्धेत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत एकूण 79 स्पर्धकांनी भाग घेतला. ज्युनियर मुलांच्या गटातून कुमार संदेश विष्णू भवर हा पहिला तर सुमेध संतोष सूर्यवंशी द्वितीय, तर मुलींच्या ज्युनियर गटातून कुमारी श्रीशा अविनाश मारकोळे प्रथम तर कुमारी बागेश्री बाळकृष्ण जोशी द्वितीय, तसेच सीनियर मुलांच्या गटातून अभिनव रमेश कदम पहिला तर प्रसाद त्रिंबक कदम द्वितीय, तसेच ज्युनियर ग्रुप प्रतियोगितेत कुमारी समृद्धी कडगे, प्रचिती यलमगुडे, अक्षरा मगदूम, कुमार लौकिक कदम, संदेश भवर व विनायक पाळेकर पहिले तर मुलांच्या ज्युनिअर गटामधून अक्षय थोरात, कट्टा साई कौशिल, कट्टा साही कौशिक, आयुष्य मोतेवार, तन्मय शृंगारे व करण शुक्ला यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.

येणार्‍या 18 फेब्रुवारी रोजी राज्य पातळीवर स्पर्धा नांदेड ठिकाणी होणार आहेत. महाराष्ट्र पूर्व च्या 18 जिल्ह्यातून 300 विद्यार्थी या राज्य पातळीवरील स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. त्यानंतर नॅशनल स्तरावर स्पर्धा दिल्ली ठिकाणी होणार आहेत.

श्रद्धेय स्वामी रामदेव जी महाराज योगासनास जागतिक दर्जा मिळावा, मुलांना योगासन करण्याची सवय लागावी, मुलांचे शरीर निरोगी रहावे, त्यांच्या शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास व्हावा या दृष्टीने हा प्रयत्न करत आहेत.

प्रथम व द्वितीय तसेच सहभाग नोंदवल्या सर्व मुलांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना चषक व पदक देण्यात आले.

या योगासन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल अमृतवार, दत्तात्रय काळे, उर्मिला साजने, राणी दळवी, श्रेयस मार्कंडेय, शिवाजी शिंदे (हळदेकर), जगन्नाथ येईलवाड, सिताराम सोनटक्के, हनुमंत ढगे, अनिल कामीनवार, शिवाजी भागवत, गजानन पाटील, सोपान काळे, राजू कोल्हे, राजू जाधव, डॉ.धनंजय इंचेकर, महारुद्र माळगे, दिलीप आघाव, रावसाहेब साजणे, बन्सीलाल कंधारकर, योगेश कोरडेवाड, महानंदा माळगे, बाळासाहेब पवार, बाळकृष्ण जोशी, श्रीपाद कनकदंडे आदींनी सहकार्य केले,