नाणार समर्थक थेट शरद पवारांची भेट घेणार; सुनील तटकरे मध्यस्थी करणार

Sunil Tatkare & Sharad Pawar

रत्नागिरी :- नाणारमधील रिफायनरी प्रकल्प राजापूरमध्येच व्हावा, यासाठी अनेक संघटना पुढे येत आहेत. दरम्यान प्रकल्प समर्थकांच्या रत्नागिरी (Ratnagiri) आणि राजापुरातील एका संयुक्त शिष्टमंडळाने रोहा येथे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची भेट घेतली.

या भेटीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी समर्थकांची भेट घडवून देण्याची मागणी करण्यात आली. येत्या काही दिवसांत अशी भेट मुंबई मुक्कामी घडवून देण्याचे अभिवचन खासदार सुनील तटकरे यांनी या शिष्टमंडळाला दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट मिळावी यासाठी प्रकल्प समर्थक संघटनेकडून मुख्यमंत्री कार्यालयाला मेलही करण्यात आला आहे. मात्र अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे प्रकल्प समर्थकांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER