नाणार प्रकल्प : राज ठाकरेंच्या एन्ट्रीनंतर शरद पवारांची भूमिका निर्णायक

Nanar Refinery Project

मुंबई : रत्नागिरी राजापूर रिफायनरी प्रकल्प (Nanar Refinery Project) हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या पत्रामुळे पुन्हा चर्चेत आला आहे . यासंदर्भात आज या प्रकल्पातून बाधित होणाऱ्या १८ गावांचे शेतकरी प्रतिनिधी राज ठाकरे यांचं अभिनंदन करण्यासाठी यांच्या दादर येथील निवासस्थानी आले होते. या लोकांनी प्रकल्पाच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्याची माहिती आहे.

‘प्रकल्पांमध्ये आमच्या गावातील आणि आमच्या स्वतःच्या जमिनी जात आहेत. परंतु त्यामुळे कोकणातील लोक आणि परिसर याचा विकास होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आमचे समर्थन आहे. या भागातील प्रकल्पाला लागणाऱ्या १० हजार एकर जमिनीपैकी ८.५ हजार एकरच्या जमीन मालकांनी आपली संमतिपत्रे या प्रकल्पासाठी दिली आहेत. असे असताना या प्रकल्पाला विरोध असल्याचा भास राजकीय लोकांकडून निर्माण केला जात आहे, असे या शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे आहे. या प्रकल्पाची चर्चा होण्यापूर्वी आणि लोकांनी कवडीमोल किमतीने आसपासच्या परिसरातील जागा विकलेली आहे. त्या लोकांना आता प्रकल्पबाधित म्हणून अधिकार राहिलेला नाही.

असेच लोक आता या प्रकल्पाला विरोध करत आहेत. त्यामुळे या लोकांची प्रकल्पात प्रत्यक्ष जमीन जात आहे अशा लोकांचे या प्रकल्पाला समर्थन आहे, अशी भूमिका आज राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. येत्या काळात या प्रकल्पबाधितांना चांगला मोबदला देण्याचा विचार झाला तर असलेला विरोधही मावळेल, अशी प्रतिक्रियादेखील गावकऱ्यांनी दिली आहे. याच लोकांशी भेट घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच आपल्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा फोन आला होता. त्यांनी या प्रकल्पाला दिलेले समर्थन योग्य असल्याचे म्हटले आहे आणि याबद्दल ते मुख्यमंत्र्यांना भेटतील, असेही म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER