नाणारच्या जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार रद्द – विनायक राऊत

Vinayak Raut

सिंधुदुर्ग : नाणार प्रकल्पासाठी जमीन खरेदी-विक्रीचे करण्यात आलेले सर्व व्यवहार रद्द करण्यात येणार आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinyak Raut) यांनी केला. यामुळे नाणार प्रकल्प होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत

देवगडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना विनायक राऊत म्हणालेत की, नाणार रिफायनरी प्रकल्प कुठल्या परिस्थितीत होणार नाही. नाणार प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी ७ लाख रुपये एकराने जमिनी विकल्या. हा प्रकल्प झाला तर या जमिनींची किंमत ९० लाख रुपये एकर होणार आहे. दलालांनी जमिनी लाटून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. २२४ गुजराती आणि मारवाडी लोकांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द करण्यात येतील. त्यांनी नाणार प्रकल्पाचे समर्थक भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावरही टीका केली.

नाणार प्रकल्प घोषित केल्यानंतर नाणारमध्ये २२०० एकर जमीन खरेदी करण्यात आली. तर अध्यादेश निघाल्यानंतर ८०० एकर जमिनीची खरेदी झाली होती. हे व्यवहार संशयास्पद असल्याने त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने आधीच चौकशी समिती बसवली आहे. त्यामुळे नाणारमधील जमीन खरेदीचे सर्व व्यवहार रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Vinyak Raut on Nanar refinery)

दरम्यान, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी नाणार प्रकल्पाचं समर्थन केलं होतं. ९० टक्के स्थानिकांनी मोबदला स्वीकारल्याने जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच धर्तीवर नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी पुढचा निर्णय घेईल, असे राजन साळवी यांनी म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर पक्षातूनच टीका झाल्याने त्यांनी सारवासारव करत हे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले. नाणारबाबत मी मांडलेली भूमिका ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीशी त्याचा काहीही संबंध नाही, असे साळवी म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER