नाणार : जमीन खरेदी व्यवहारांची होणार चौकशी – नाना पटोले

Nana Patole

मुंबई : रद्द झालेल्या नाणार प्रकल्पाच्या परिसरातील जमीन खरेदी-विक्रींच्या व्यवहारांची चौकशी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करा, भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनी परत करण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करा, प्रकल्पाचा सुगावा लागताच घाऊक पद्धतीने जमिनी विकत घेण्यात परप्रांतीय व्यापाऱ्यांचे रॅकेट सक्रिय होते का, याचाही तपास करून एक महिन्याच्या आत कृती अहवाल सादर करा, असा आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीतर्फे देण्यात आलेल्या निवेदना संदर्भात आज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्‍तरीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी पटोले यांनी हे आदेश दिले. बैठकीत समितीतर्फे भावकीच्या सामुहिक मालकीच्या जमिनीची परस्पर विक्री होणे, बेपत्ता व मृत व्यक्तींच्या नावे बनावट आधार कार्ड काढून जमिनी विक्रीचे व्यवहार करणे किंवा ठराविक कालावधीत अचानक खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार होणे असे अनेक मुद्दे मांडले.

नाणार प्रकल्पाच्या वेळी अशा प्रकारे झालेले जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार संशायस्पद आहेत. प्रकल्पाची अधिसूचना निघण्याआधी कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करुन त्यांना उचित मोबदल्यापासून वंचित ठेवले असल्यास ही एक प्रकारे भूमिपुत्रांची फसवणूक ठरते. परप्रांतीयांकडून अशा प्रकारे भूमीपुत्रांना फसविणे जाणे योग्य नाही. भविष्यात असे प्रकारे घडू नये यासाठी उपाययोजना करा, असे नाना पटोले म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER