काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित, आज सोनिया गांधींची भेट घेणार

Nana Patole

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष (Congress state president) कोण होणार, याची प्रतीक्षा राज्यभरातील कॉंग्रेसजनांसह सर्वांनाच लागली आहे. मागील दोन महिन्यांपासून चर्चांवर चर्चा आणि बैठकांवर बैठका पार पडत आहे. पण तरीही पुढचे महराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? हे समोर येत नाहीय. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं नाव जरी निश्चित मानलं जात आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सगळे अधिकार दिलेले आहेत. आज नाना पटोले यांची एच. के. पाटील भेट झाली. दरम्यान, नाना पटोले दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन त्यांच्या कानावर होत असलेला विलंब आणि त्यामुळे पक्षाविषयी समाजात जाणारा चुकीचा मेसेज याविषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER