नाना पटोलेंचं ‘मिशन विदर्भ‘ ; भाजपमध्ये गेलेल्या अनेकांची लवकरच घरवापसी

Nana Patole

नागपूर :- भाजपचा (BJP) गड म्हणून ओळख असलेल्या विदर्भात आता काँग्रेसने (Congress) पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. उद्यापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) ‘मिशन विदर्भ’ सुरु करणार आहेत. ते उद्यापासून संपूर्ण विदर्भाच्या दौऱ्यावर निघणार आहेत. विदर्भात संघटना मजबूत करण्यावर आता त्यांचा भर असणार आहे. नाना पटोले रविवारी गोंदियामधून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये गेलेल्या असंख्य नेत्यांची दौऱ्यावेळी घरवापसी होणार असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे.

विदर्भ हा भाजपचा गड समजला जातो. भाजपच्या या गडाला खिंडार पाडण्यासाठी उद्यापासून काँग्रेसचं मिशन विदर्भ सुरु होत आहे. पक्ष मजबूत करणे, पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना परत आणणे, कार्यकर्त्यांना पुढील कार्यक्रम देणे, यासाठी नाना पटोले उद्यापासून विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत. विदर्भातील प्रत्येक जिल्हयात जावून ते पक्ष उभारणीवर विशेष भर देतील. उद्या गोंदिया जिल्ह्यातून आपल्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात करणारअसल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button