काँग्रेस सर्व निवडणूका लढणार स्वबळावर, नाना पटोलेंची घोषणा

Maharashtra Today

गोंदिया :- राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. त्या दृष्टीने पक्षाने तयारी केली आहे. निवडणुका स्वबळावरच, असा पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचादेखील सूर आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

पटोले रविवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पत्रपरिषदेत ते म्हणालेत – केंद्रातील भाजपाचे सरकार राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारलादेखील काम करू देत नाही. मराठा समाजाचे आरक्षण रद्द होण्यास केंद्र सरकारचेच धोरण जबाबदार आहे. या सरकारचा खरा चेहरा जनतेपुढे आणण्यासाठी व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मी महाराष्ट्राचा दौरा करत आहे.

एमबीबीएसच्या परीक्षा पुढे ढकला

सध्या सर्वत्र कोरोनाची (Corona) साथ सुरू आहे. अशात १० जूनला एमबीबीएसच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण वाढली असून, या परीक्षा पुढे ढकला, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्याशी चर्चा करून या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button