शिवसेना-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर नाना पटोलेंचा संताप अनावर

ncp-shivsena-congress

मुंबई :- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या मुद्यावरून काँग्रेस आपली भूमिका मांडत आहे. आज काँग्रेस नेत्यांची विधानभवनात (Vidhanbhavan) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) भूमिकेवर संताप व्यक्त केला .

विधानभवनात काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस गट नेते बाळासाहेब थोरात (Balasahed Thorat), उर्जा मंत्री नितीन राऊत, कॅबिनेट मंत्री सुनिल केदर (Sunil Kedar) यांच्यासह इतर आमदार उपस्थितीत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चांगलेच भडकले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षावर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीने केलेल्या विरोधावरून पटोले कमालीचे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, अशी आग्रहाची मागणी काँग्रेसने केली होती. पण, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अनुकूल नसल्याने पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER