नाना पटोलेंनी दिला राजीनामा पण, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षासाठी अमित देशमुखांचे नाव आघाडीवर!

Amit Deshmukh-Nana Patole

मुंबई : काँग्रेसमध्ये नवा प्रदेशाद्यक्ष निवडण्यावरून वेगाने घडामोडी घेत आहेत. नव्या प्रदेशाध्यक्षासाठी कालपर्यंत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव निश्चित मानले जात होते. यासाठी त्यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण, रात्रभरातून स्थिती बदलली सध्या प्रदेशाध्यक्षासाठी अमित देशमुखांचे (Amit Deshmukh) नाव आघाडीवर आहे!

असे कळते की, प्रदेशाध्यक्षासाठी नाना पटोले (Nana Patole) यांचे नाव निश्चित झाल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष सोबत मंत्रिपदही मागितले होते. दिल्लीतील पक्षश्रेष्ठी यासाठी अनुकूल नाहीत; त्यांना पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष पाहिजे आहे. मात्र, यानंतर पुन्हा प्रदेशाद्यक्ष म्हणून नानांचे नाव पुढे आले होते.

राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे. त्यासाठी सत्तेच्या वाटाघाटीत पक्षाची बाजू आक्रमकपणे लढवणारा प्रदेशाद्यक्ष असावा या विचारातूनही नाना पटोले यांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेऊन काँग्रेसची प्रदेशाद्यक्ष म्हणून नाना पटोलेंना पसंती होती पसंती होती. यासाठी नाना पटोले यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

मात्र, रात्रीतून स्थिती बदलली असे सूत्रांनी सांगितले. नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतरही नाना पटोले किंवा कुठल्याच काँग्रेस नेत्याने पटोलेच प्रदेशाध्यक्ष असतील, असे म्हटलेले नाही. दिल्लीतूनही अजून पटोलेंच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदी घोषणा झालेली नाही. कारण, पटोले आक्रमक नेते आहेत त्यांना प्रदेशाध्यक्ष केले तर तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार अडचणीत येऊ शकते, अशी काँग्रेसला भिती आहे. आता सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढे आहे!

गटबाजी
काँग्रेसमध्ये राज्यात थोरात, चव्हाण, वडेट्टीवार, राऊत असे वेगवेगळे गट आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशीही गटबाजी दिसून आली आहे. त्यात अमित देशमुख यांच्या नावाला अशोक चव्हाण गटाचा विरोध आहे, अशी चर्चा आहे. थोरातांनी संपूर्ण वजन अमित देशमुखांसाठी वापरल्याचे कळते. थोरात आणि अमित देशमुखांचे वडील विलासराव यांच्यात चांगले संबंध होते त्याच पार्श्वभूमीवर पटोलेंऐवजी देशमुख प्रदेशाध्यक्ष झाले तर आश्चर्य वाटू नये.

या सर्व घडामोडींनंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे नाना पटोले यांना मंत्रिपद देऊन काँग्रेस त्यांचे पुनर्वसन करणार, अशी चर्चा आहे.

ही बातमी पण वाचा : नाना पटोलेंच्या राजीनाम्याच टायमिंग चुकलं, मुंख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER