नाना पटोलेंनी वाढवले अजितदादा, भरणेंचे टेन्शन, इंदापूरच्या जागेवर ठोकला दावा

Ajit Pawar - Dattatray Bharne - Nana Patole

इंदापूर :- काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा शाब्दिक बॉम्ब टाकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यसह राष्ट्रवादीतील (NCP) नेत्यांचं टेन्शन वाढवलं आहे. इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल असं म्हणत पटोले यांनी इंदापूरच्या जागेवर दावा ठोकला. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांचं टेन्शन वाढलं आहे.

गुरुवारी पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इंदापूरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोलेंनी केलेल्या एका विधानामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर अजित पवार आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे. इंदापूरची जागा काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी नेहमी महत्वाची असते. या जागेसाठी थेट दिल्लीतून तडजोड केली जाते. याच जागेच्या वादातून हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात (BJP) प्रवेश केला होता. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दाव्यानुसार इंदापूरमध्ये जर पुढील आमदार काँग्रेसचा असेल तर मग राष्ट्रवादीचं काय? अशी चर्चा आता इंदापुरच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. साहजिकच पटोले यांनी इंदापुरात येऊन भरणे आणि अजितदादांचं टेन्शन वाढवलं आहे.

दरम्यान, इंदापूरची जागा पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. एकतर बारामतीला लागूनच इंदापूर तालुका आहे. त्यातही या तालुक्याचे नेतृत्व ज्यांनी मागील २०-२५ वर्ष केले त्या हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंबामध्ये विस्तवही जात नाही. अशावेळी काहीही करुन हर्षवर्धन पाटील यांना त्यांची जागी दाखवायची, या प्रयत्नात राष्ट्रवादी असते. मागील विधानसभेत हेच ध्येय ठेऊन काँग्रेस पक्षाकडे ही जागा असताना देखील सध्या या जागेवर राष्ट्रवादीचे भरणे हे स्टँडिंग आमदार आहेत, हे कारण सांगून राष्ट्रवादीने इंदापूरची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला होता. मात्र नाना पटोले यांनी केलेल्या दाव्यामुळे ‘मित्रासाठी’ ‘मित्रपक्षाला’ अजित पवार त्यांच्या स्वभावानुसार अंगावर घेणार का? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button