भविष्यात भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरू नये : नाना पटोले

नागपूर : स सर्वोच्च न्यायालयाने (Suprme court) ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द केले. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. याला सर्वस्वी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, असा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ओबीसी समाजावर भाजपने घात केला आहे. त्यामुळे आता त्यांनी ओबीसी समाजाला ग्राह्य धरू नये, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले. “भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता.

आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत भाजपची रणनीती दुतोंडी आहे.” असे नाना पटोले यांनी म्हटले. पटोले यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी जनगणनेचे आकडे जाहीर करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरू नये, असे त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button