नाना पटोलेंनी घेतली राहुल गांधींची भेट

- प्रदेशाध्यक्ष निवड अंतिम टप्प्यात

Nana Patole - Rahul Gandhi

नवी दिल्ली : राज्यातील काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असलेले नाना पटोले (Nana Patole) यांनी काळ (बुधवारी) दिल्ली येथे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मिळाला नाही. मात्र, या भेटीनंतर नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीच्या आणखी एक पाऊल जवळ गेलेत, अशी चर्चा आहे.

महाराष्ट्रात मोठ्या संघटनात्मक बदलाचे संकेत

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासोबत महाराष्ट्रात आणखीही काही संघटनात्मक बदल होणार आहेत. राज्यातील कार्याध्यक्ष बदलण्यासाठी हायकमांड आग्रही असल्याचे कळते. विद्यमान पाच कार्याध्यक्षांसह कार्याध्यक्षपदात वाढ होऊ शकते.

अनुभवी म्हणून नाना पटोलेंना प्राधान्य

राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची भावना आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष सोबत निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात येते आहे, अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER