… सोबत मंत्रीपदही मागितल्याने नाना पटोलेंचे अध्यक्षपद हुकले ?

Nana Patole

मुंबई : काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. या पदाच्या शर्यतीत असलेले विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रदेशाध्यक्षपदासोबतच मंत्रीपदाचीही मागणी केली, त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने हायकमांडला प्रदेशाध्यक्षपदाची निवड तूर्त स्थगित करण्यास भाग पाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. (nana patole won’t be a next congress president of maharashtra?)

एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे की, काँग्रेस हायकमांडने विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद काढून नाना पटोले यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला होता. पटोले यांच्या नेतृत्वात पक्षाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल आणि ते पक्षाला भरपूर वेळ देऊ शकतील या हेतूने पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नानांकडे सोपवण्यात येणार होती. थोरात हे विधानसभेतील पक्षाचे गट नेते आहेत. राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. थोरात यांच्यावर तीन तीन जबाबदाऱ्या असल्याने ते प्रदेशाध्यक्षपदाला न्याय देऊ शकत नाहीत, असे हायकमांडला वाटते. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीने पक्षाच्या विस्तारावर भर दिला आहे. त्यामुळेही पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झाल्या होत्या.

पटोलेंना हवे ऊर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम खाते

असे कळते की, पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शिक्कामोर्तब केले होते. त्यांच्या नियुक्तीपत्रावर सहीही केली आहे. मात्र पटोले यांनी ऐनवेळी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रीपदाची मागणी केली. ऊर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद देण्याची मागणी पटोले यांनी केली. पटोले यांच्या या मागणीवर सोनिया गांधीही आश्चर्यचकीत झाल्या. त्यांनी पटोले यांची मागणी धुडकावून लावली.

नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू

काँग्रेस हायकमांडला प्रदेशाध्यक्षपदाची भूमिका योग्यरितीने पार पाडेल असा नवा प्रदेशाध्यक्ष हवा आहे. इतर कोणतीही जबाबदारी न घेता फक्त प्रदेशाध्यक्षपदाचीच जबाबदारी पार पाडेल, अशा प्रदेशाध्यक्षाची केंद्रीय नेत्यांना गरज आहे. नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्याची जबाबदारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पाटील यांनी पक्षाच्या प्रत्येक आमदाराशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. (nana patole won’t be a next congress president of maharashtra?)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER