काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची निवड

nana Patole & Congress

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची वर्णी लागली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी कालच राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या 24 तासात नाना पटोले यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष तर त्यांच्या दिमतीला 6 कार्याध्यक्षही देण्यात आले आहेत. याशिवाय दहा उपाध्यक्षांची समावेश आहे.

विद्यमान कार्याथ्यक्ष यशोमती ठाकूर, विश्वजित कदम यांना हटवलं आहे. त्याऐवजी चंद्रकांत हांडोरे, प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.

नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेस प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सांभाळताना या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

कार्यकारी अध्यक्ष कोण?

1. शिवाजी मोघे (यवतमाळ)
2. बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
3. नसीम खान (मुंबई)
4. कुणाल पाटील (धुळे)
5. चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
6. प्रणिती शिंदे (सोलापूर)

काँग्रेसचे 10 नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष कोण?

1. शिरीष चौधरी (जळगाव)
2. रमेश बागवे (पुणे)
3. हुसैन दलवाई (मुंबई)
4. मोहन जोशी (पुणे)
5. रणजीत कांबळे (वर्धा)
6. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद)
7. बी. आय. नगराळे
8. शरद अहेर (नाशिक)
9. एम. एम. शेख (औरंगाबाद)
10. माणिकराव जगताप (रायगड)

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER