इंग्रजांनाही पायउतार व्हावे लागले, यांनाही खेचल्याशिवाय राहणार नाही : नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सध्या देशाचं सरकार मूठभर लोक चालवात, अशी टीका केली. देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांची संख्या यांच्यापेक्षा जास्त होती, त्यांनाही पायउतार व्हावं लागलं, त्यामुळं केंद्रातील सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केले. परंतु भाजपाच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रीय झाला आहे. सोशल मीडियाच्या या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेसचे दोन लाख गांधीदूत भाजपाच्या विखारी प्रचाराला चोख उत्तर देतील, असे पटोले यांनी म्हटले आहे.

भाजपच्या विखारी प्रचाराला थांबवणार

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सोशल मीडियाला 2 लाख युवक जोडले जाणार आहेत. हे सर्वजण गांधी दूत म्हणून काम करणार आहेत. भाजपच्या विखारी प्रचाराला थांबवण्यासाठी ही टीम कार्यरत असेल. भाजपाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने अपप्रचार केला जातो. भाजपा ही खोटी माहिती पसरवणारी मोठी फॅक्टरी आहे. पण आता याच माध्यमातून भाजपाला काँग्रेसकडून उत्तर मिळेल, असं नाना पटोले म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ज्या विमानामध्ये बसले त्यामध्ये काही तरी तांत्रिक अडचण होती. त्यांच्या जीवाची आम्हाला काळजी आहे. ते विमानात बसले नाही तर उतरवण्याचा काही प्रश्नच येत नाही, असंही पटोलेंनी स्पष्ट केले. सांगितलं.

मी विधानसभा अध्यक्ष होतो त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती समितीवर करण्यात आली. आम्ही लोकशाहीला मानणारे आहोत त्यांच्यासारखी कृती आम्ही केली नाही. राज्यपाल यांच्यावर कोण कोण दबाव आणत आहे हे आम्हाला माहीत आहे. मला जर बॅलेट वरती मतदान करायचं असेल तर तो माझा मूलभूत अधिकार आहे. त्यांना जर ईव्हीएम मशीन वरती मतदान करायचं असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. ज्याला ज्यावर मतदान करायचं त्याचा तो अधिकार आहे, अशी टिप्पणी नाना पटोलेंनी अजित पवारांच्या ईव्हीएम संदर्भातील वक्तव्यावर केली.

शेतकरी मुद्द्यावरुन भाजपमध्ये असताना थेट नरेंद्र मोदी यांना आव्हान देत खासदारकीचा राजीनामा नाना पटोले यांनी दिला होता. आता त्यांनी थेट नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं सांगितलं. त्यासाठी फक्त पक्षानं आदेश देण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विधानपरिषेदच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रश्नी राज्यपालांवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा दबाव आहे का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER