आगामी निवडणुका स्वबळावरच, नाना पटोलेंनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका

Nana Patole

मुंबई : राज्यात पहिल्यांदाच शिवसेनेने (Shivsena) भाजपशी (BJP) फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसला (Congress) सोबत घेऊन महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन केले. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारांचे असल्याने भाजपा नेत्यांकडून सातत्याने हे सरकार जास्त चालणार नाही. लवकरच पडणार, असा दावा केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे अनेकदा या सरकारमध्ये मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे, आगामी निवडणुका जागावाटप करुन एकत्रच लढतील का, हा मोठा प्रश्न आहे. त्यातच, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले आहे. .

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली. राज्यात काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे; परंतु २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला. सकाळ वृत्तपत्राशी बोलताना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी सरकार हे केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अस्तित्वात आले आहे. तेही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी किमान समान कार्यक्रमाची आखणी केल्यानंतर सरकार स्थापन झाले. त्यामुळे, आगामी काळात सरकारच्या योजना जनतेला दिसून येतील, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

नाना पटोले म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीला मोदी सरकारच जबाबदार आहे. कोरोना हा देशाला आर्थिक डबघाईला आणणारा आजार आहे, हे सर्वात आधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले होते. या आजाराला गांभीर्याने घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. मात्र भाजपच्या काही लोकांनी त्यांना समाजमाध्यमांवर वेड्यात काढले. आता परिस्थिती आपण पाहातच आहोत, असे म्हणत कोरोनावर बोलताना पटोले यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button