कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा; नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन

Uddhav Thackeray-Nana Patole

मुंबई :- तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) कोकणच्या दौऱ्यावर आहेत.रत्नागिरीत झालेल्या नुकसानीची पटोले यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी गरज पडल्यास कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) केले आहे.

रत्नागिरीतील (Ratnagiri) नुकसानीची पाहणी केल्यानंतर नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. कोकणाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कोकणातील लोकांना पुन्हा उभं केलं पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत नाही दिली तरी राज्य सरकारने पुढाकार घेऊन कोकणवासियांना मदत द्यावी. कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल पण लोकांना भरीव मदत करा, असं आवाहन पटोले यांनी केलं आहे. तसेच वस्तुस्थिती आणि तिजोरी पाहून मुख्यमंत्री नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करतील, असेही पटोले म्हणाले .

पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला

मोदी यांनी गुजरातला एक हजार कोटी दिले तर महाराष्ट्राला दोन हजार कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी काहीच मदत केली नाही. पंतप्रधान काय फक्त गुजरातचे आहेत का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

भाजपने गलिच्छ राजकारण सुरू केले आहे. खरंतर ही राजकारण करण्याची वेळ नाही. अडचणीत आलेल्या लोकांना मदत कशी करता येईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. नैसर्गिक आपत्तीत केंद्राने मदत केलीच पाहिजे. हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. केंद्राच्या तिजोरीत महाराष्ट्राचा 40 टक्के हिस्सा जातो हे लक्षात ठेवा, असेही पटोले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button