जागतिक मातृदिन : ‘आता कोणी दम देत नाही!’ नाना पाटेकरांची भावुक पोस्ट

Nana-Patekar-mother

मुंबई :- जागतिक मातृदिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आईच्या आठवणीत ट्विटरवर भावुक पोस्ट लिहिली आहे. ‘आई तीन महिन्यांपूर्वी गेली आणि मी अचानक मुलाचा म्हातारा झालो. आता कोणी दम देत नाही’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. नानांची आई निर्मला पाटेकर यांचे जानेवारीत वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९९ वर्षांच्या होत्या.

नाना पाटेकर आईसोबत वन बीएचके फ्लॅटमध्ये राहात होते. त्यांनी अनेकदा आपल्या आईच्या अविस्मरणीय गोष्टी मुलाखतीत सांगितल्या आहेत . आईच्या निधानपूर्वी दिलेल्या मुलाखतीत नाना म्हणाले होते की, ‘मी जेव्हाही आईबद्दल बोलत असतो तेव्हा मला काहीतरी होतं… मला माहीत आहे की ती या जगाचा कधीही निरोप घेऊ शकते.  त्यामुळे जेव्हा मला फोन येतो तेव्हा मी घाबरतो. जेव्हाही आई मला बाहेर जाताना पाहते, तेव्हा ती माझा हात पकडते आणि रडायला लागते’ असं त्यांनी म्हटलं होतं.

ही बातमी पण वाचा : खऱ्या १६ तोळे सोन्याऐवजी झवेरी बाज़ारातील व्यापाऱ्याला पाठवले तांबे