.. म्हणून ‘वेल्हा’ तालुक्यास राजगड नाव द्या ; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

supriya-sule-demands-CM Thackeray

मुंबई : छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या राजगड किल्ल्याचा स्वराज्याची पहिली राजधानी असा लौकिक आहे. तो किल्ला राजगड वेल्हा तालुक्यात आहे. या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हा तालुक्यास ‘राजगड’ नाव देण्याची मागणी केली आहे.

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हा तालुक्यास राजगड हे नाव द्यावे. यासाठी मी पाठपुरावा करीत आहे.

याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. आता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेतून आलेल्या या मागणीचा विचार करून वेल्हा तालुक्यास राजगड हे नाव द्यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. विशेष म्हणजे जुन्या दस्तऐवजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते १९४७ सालापर्यंत या तालुक्याचा ‘राजगड तालुका’ असाच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने १९३९ साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात ‘तालुका राजगड’ असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही ‘तालुका राजगड’ उल्लेख आढळतो. हे सर्व मुद्दे लक्षात घेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा ‘राजगड’ असे नामकरण व्हायला हवे, असे सुप्रिया यांनी म्हटले.