नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या

ना. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

Eknath Shinde & CM

मुंबई : नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव द्या, अशा मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सादर केले. मंत्री शिंदे यांनी दिलेल्या निवेदनाचा आशय पुढीलप्रमाणे – शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहे.

कोरोनाच्या कठीण काळातही राज्याच्या विकासाच्या गाडीचा वेग मंदावू न देण्याची दक्षता घेण्यात आली. यामुळेच राज्यात उद्योग क्षेत्राशी निगडित असे ६१ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात विविध विकास प्रकल्पांची कामे धडाक्यात सुरू आहेत. यातीलच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम सिडकोच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे. या विमानतळाला हिंदुसदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. मराठी माणसाला आत्मभान देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. मराठी माणसाला उत्तुंग झेप घेता यावी, यासाठी त्याच्या पंखात बळ भरण्याचे काम बाळासाहेबांनी केले. अशा उत्तुंग नेत्याचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे हा त्या वास्तूचा गौरव करण्यासारखे आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्यावतीने केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी विनंती शिंदे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER