नवी मुंबई विमानतळाचे नाव ठाकरे की पाटील? भाजप आणि शिवसेनेत जुंपली

Navi Mumbai Airport

नवी मुंबई :- नवी मुंबईतील विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा आगामी काळात तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर भाजपने लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी उचलून धरली आहे. त्यामुळे ठाकरे की पाटील? या मुद्द्यावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भाजप आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उचलून धरली आहे. नवी मुंबईतील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही. नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने सक्तीने जमिनी संपादित केल्या होत्या. भूमिपुत्रांना या जमिनींचा योग्य मोबदला मिळावा म्हणून दि. बा. पाटील यांनी मोठा लढा दिला होता. त्यामुळे या विमानतळाला त्यांचे नाव देणे योग्य होईल.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचाही पाटलांच्या नावाला विरोध नसेल, असं सांगतानाच नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरात राजकारण होऊ नये, असं आवाहन ठाकूर यांनी केलं आहे. तर, यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. बाळासाहेबांचं योगदान सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्या गौरव म्हणून या विमानतळाला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER