बीएचआर घोटाळाप्रकरणात मोठ्या व्यक्तीचं नाव, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Eknath Khadse

जळगाव :- 2018 पासून पाठपुरावा सुरू असलेले बीएचआर गैरव्यवहार प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. तसेच, खडसे यांनी या प्रकरणात मोठा नेत्यांचा समावेश असल्याचा गौप्य स्फोट त्यांनी केला आहे.

या प्रकरणातील सर्व सत्य बाहेर येणार असा दावा खडसे यांनी केला आहे. या प्रकरणात बड्या नेत्‍याचे नाव असून ज्‍याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्‍याचा गौप्यस्‍फोट एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू असताना आज माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सदर प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या ॲड. किर्ती पाटील देखील उपस्‍थित होत्‍या.

खडसे यांनी सांगितले, की बीएचआरचा साधारण 1100 कोटी रूपयांचा घोटाळा आहे. याबाबत 2018 मध्ये ॲड. किर्ती पाटील यांनी राधा मोहन यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्‍यावेळी त्‍यांनी राज्‍य शासनाला सदर प्रकरणाची चौकशी इओडब्‍ल्‍यू यांच्या मार्फत करण्याचे आदेश काढले होते. मात्र या प्रकरणाची चौकशीत पुण्यात राजकीय व्यक्‍तीकडून दबाव आणण्यात आल्‍याने तात्‍पुरती स्‍वरूपाची चौकशी झाल्‍याचे दाखवून प्रकरण दडपण्यात आले. इतकेच नाही, तर त्‍यावेळी विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देखील बीएचआरचे अवसायक असलेले कंडारे यांच्याकडे माहिती मागितली होती. मात्र त्‍यांनी दिली नाही. पण बीएचआरची प्रॉपर्टी कमी किंमतीत घेतल्‍याचे खडसे यांनी सांगितले

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी झालेल्‍या चौकशीदरम्‍यान सापडलेल्‍या कागदपत्रांमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे लेटरपॅड आढळून आले आहे. याबद्दल बोलताना खडसे म्‍हणाले, की कोणाचे लेटरपॅड सापडले म्‍हणून त्‍याचा प्रकरणाशी संबंध येतो असे होत नाही. कारण कोणी चोरून देखील लेटर पॅड नेवू शकतो.

गिरीश महाजन यांनी या प्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर एकनाथ खडसे यांनी नुसता तोंडी बोलणं उपयोग नाही. पूराव्या शिवाय मी बोलत नाही. अशी प्रतिक्रिया देत कुठलेही पुरावे नसताना माझ्यावरती ही आरोप करण्यात आले होते. अनेक वर्ष माझावर अन्याय करण्यात आला. मी पुराव्याशिवाय आरोप करत नसल्याचे एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.

ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसे इन ॲक्शन, आज संध्याकाळी करणार मोठा खुलासा ; भाजपच्या अडचणी वाढणार ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER