आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ‘नाम’ची मदत

Naam

अकोला : अकोट (Akot) तालुक्यातील सावरा येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन दौलत सपकाळ (५०) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ते मजुरीलासुद्धा जाऊन कुटुंबाचा गाडा चालवत. कोरोनामुळे मजुरी बंद झाली. शेतीवर बँक व खासगी सावकाराचे कर्ज झाले होते.

कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) व मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांनी स्थापन केलेल्या नाम संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सानुग्रह मदत म्हणून १५ हजार रुपयांचा धनादेश पत्नी मीना गजानन सपकाळ यांना देण्यात आला.

ही मदत ‘नाम’चे विदर्भ व खान्देश समन्वयक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा समन्वयक माणिक शेळके यांच्या हस्ते देण्यात आली. आतापर्यंत नाम फाउंडेशनने विदर्भ व मराठवाडा या भागात आठ गावे दत्तक घेतली असून अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंधारण, तलाव खोलीकरण, नद्यांमधील गाळ उपसणे आदी कामे केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER