नको रे मना मत्सरू दंभ भारू

Sad - Maharashtra Today

एकदा एक भक्त अत्यंत दुःखी कष्टी होऊन आपल्या गुरूकडे जातो . म्हणतो मला काहीतरी उपाय सुचवा. फार दु:खी आहे मी. पुरेसा पैसा नाही ,आरोग्य नाही. इतरांसारख कुठलं सुख नाही. माझं सगळे मित्र मंडळ सुखात आहे , एकाचे प्रमोशन झाले , कुणाच्या मुलीला चांगलं स्थळ मिळालं .पण माझ्याच बाबतीत कायमच ही स्थिती असते . यावर गुरु म्हणाले, तू उद्या पहाटे माझ्या बरोबर फिरायला जंगलात चल. मी तुला उत्तर सांगेन . शिष्य तयार झाला. दुसऱ्या दिवशी उत्सुकतेने तो भल्या पहाटे गुरुजींकडे गेला आणि मग त्यांच्या बरोबर फिरायला जंगलात गेला. काही काळ गेल्यानंतर तो अस्वस्थ होऊ लागला. गुरुजी मात्र अत्यंत शांत होते. हळूहळू त्याचा संयम सुटत चालला होता.

एवढे अंतर पार झाल्यावरही अजून ही ते काहीच सांगत नव्हते. तेवढ्यात गुरुजींनी तिथे असलेला एक थोडा जड असा दगड त्याला उचलायला सांगितला . मग तो त्या दगडासकट चालू लागला. सुरुवातीला ते ओझे घेऊन चालणे शक्य होते ,नंतर मात्र तो सतत या हातातून त्या हातात दगड घेत होता. पुढे मात्र ओझे असह्य झाले. ते आता त्याच्याकडून पेलवेना . त्याने गुरुजींना सांगितलं, तेव्हा ते मंद स्मित करून म्हणाले ,मग ठेव की ते खाली. ते धरून ठेव म्हणून मी कुठे सांगितलं तुला ? मी केवळ दगड उचलायला सांगितला. तो म्हणाला, गुरुजी तुमच्या आज्ञेशिवाय मी कसं खाली ठेवणार ? अरे हेच तर त्याचे उत्तर आहे. कुठलीही गोष्ट हातात आल्यानंतर ती त्रास होत असेल तर खाली टाकून द्यायला हवी. तुला ह्या संसारात होणारे दुःख, वाट्याला आलेला त्रास, दुसऱ्यांबद्दल वाटणारा मत्सर, हे सगळं सगळं तू धरून ठेवतो .सोडून देत नाही. आणि मग इतर लोक कसे सुखी, त्यांच्या जवळ असणाऱ्या गोष्टींचा हेवा करीत राहतो. तुझं सगळं लक्ष सगळी ऊर्जा केवळ यावरच खर्च होते.जे तुला कुणीही सांगितलं नाही जोपासायला !

फ्रेंड्स ! असं आहे तर ते. मत्सर किंवा जेलसी, ही खरं एक नैसर्गिक भावना आहे. इतर राग लोभ मोह प्रेम या सगळ्यां प्रमाणेच. परंतु ती फक्त असमाधान अशी आपल्या पर्यंतच राहते, तोपर्यंत ठीक असतं .तिची जागा जेव्हा इर्षा घेते, त्यावेळी तेथे षड्यंत्राचा उदभव होतो. उदाहरणार्थ या मत्सराचे दोन प्रकार बघायला मिळतात. एक असतो Distructive . जेव्हां हा मत्सर दुसऱ्यांना इजा पोहोचवतो, त्यातून नकारात्मक परिणाम होतात. असा मत्सर. उदाहरणार्थ जेव्हा आपली गर्लफ्रेंड दुसऱ्या कुठल्यातरी मुलाबरोबर दिसते, त्यावेळी प्रचंड संताप येतो. आणि मग ती कशी वाईट आहे हे हे पटवून देण्यासाठी ,भडकवून देण्यासाठी प्रयत्न होतात. त्यातून निगेटिव्ह इफेक्ट होतो.

परंतु दुसरा प्रकार म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह. याठिकाणी जेलसीचा उपयोग स्वतःला मोटिवेशन, प्रेरणा मिळवून देण्यासाठी केला जातो. आणि त्यातून स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल केले जातात. म्हणजेच हा मत्सर चाकू सारखा आहे. त्याचा उपयोग चांगला केला तर त्यांनी फळ, भाजी कापू शकतो, केक कापू शकतो. परंतु त्याचाच उपयोग मारण्यासाठी पण होऊ शकतो. म्हणजेच वस्तूकडे आपण कोणत्या दृष्टीने बघतो, त्यावर ती किती आणि कशी उपयोगाची ते ठरत असतं.

म्हणजेच मत्सराची जागा जर स्वतःच्या बरोबरच इतरांच्या विकासाचा प्रयत्न देखील करत असेल तर त्याचा सकारात्मक उपयोग झाला असं आपण म्हणू शकतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये तर एकूणच समाजामध्ये इतकी स्पर्धा,इर्षा वाढली आहे, की अगदी लहान मुलांपासून याची सुरुवात होते. एखाद्या मुलाला जर वर्गांमध्ये नेहमीच फर्स्ट येण्याची सवय असेल, तर कायमस्वरूपी त्याला एक प्रकारची भीती, दुसरे कोणी आपली पहिली जागा घेईल म्हणून वाटणारी असुरक्षितता ग्रासून राहते. स्वतःला मिळणाऱ्या यशाची गोडी तो चाखू शकत नाही.

जेव्हा दोन कुटुंब कुठेतरी ट्रीपला निघतात. उद्देश अतिशय छान असतो. कुटुंबियांबरोबर हास्यविनोद करत, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत, खात-पीत मस्त ते ट्रीपला निघतात. पण कधी, कुठल्यातरी एका क्षणी कोणालातरी दुसऱ्याच्या पुढे जाण्याचा मोह होतो, तो गाडीचा स्पीड वाढवतो, आणि गाड्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते. त्या पूर्ण प्रवासाचा हेतू आणि आनंद बदलून जातो. स्पर्धा करण्याच्या नादामध्ये तो प्रमुख व्यक्ती आपल्या कुटुंबियांशी बोलणे बंद करतो, निसर्ग सौंदर्याकडे त्याला बघता येत नाही.

हीच स्थिती जीवन जगत असताना सुद्धा होते, आपली मूल्य , एथिक्स या सगळ्यांशी तडजोड करून, आपण स्पर्धा करत आपले आयुष्य बदलून टाकतो, या जीवनातील प्रवास प्रक्रियेचा, आनंद आपण घालवून टाकतो. खरंतर बघितल्याप्रमाणे ,स्पर्धा करताना ,प्रवासाला निघाल्यानंतर त्या त्या गाडीचा प्रकार, प्रत्येक जणांची गाडी चालवण्याची पद्धत, गाडी किती जुनी आहे, पेट्रोलची आहे की डिझेलची आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. हीच स्थिती प्रत्यक्षात पण असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची क्षमता, वातावरण, परिस्थितीची मागणी गरज, ही वेगवेगळी असते. त्यामुळे ईर्ष्या, मत्सर, स्पर्धा

यातून काही साध्य होत नाही. मग यातून बाहेर येण्यासाठी काय करायचं तर —

* दुसऱ्यांची तारीफ करायला शिकायला हवं. म्हणजे उगीचच नाही, पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत असं वाटतं याचा आवर्जून उल्लेख करावा. दुसऱ्यापासून काही चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या असतील तर त्यासाठी आपल्याला प्रेरणा म्हणून त्याचा उपयोग होईल. कॉपी करायची गरज नाही.
* दुसऱ्यांबरोबर तुलना करू नका . मी जसा आहे तसा आहे. माझ्यात हे कमी आहे. याचं नीट अवलोकन करा. आपल्यातल्या कमी गोष्टींना झाकून टाकण्याचा प्रयत्न नका करू. तर सत्य स्वीकारा. नाहीतर दुसरा कोणी पुढे गेला त्याच्याजवळ हे आहे ,ते आहे म्हणून तो पुढे गेला. अशा आपल्या अपयशांना आपण सबबी ,excuses शोधत राहतो.
* मत्सराचे मूळ हे तुलनाच आहे. त्यामुळे आपली बॉडी लँग्वेज सुद्धा चेंज होते. आपल्यामध्ये असणारा न्यूनगंड ही तुलना करायला भाग पाडतो.

१) एक दीर्घ श्वास घ्या .पाच सेकंदाचा. सोडताना तोंडातून सोडा.
२) भूतकाळातील आपल्या चांगल्या आठवणी, यश, सन्मान आठवून परत visualise करा.
३) स्वसंवाद वाढवा. आपण कुठल्या कारणांनी इतरांशी तुलना करतो आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं आहे? याचा अंदाज घ्या.
४) सोशल मीडिया पासून दूर राहा. त्यात येणारे फोटोज, पोस्टस् हे पाहून मनात कम्पॅरिझन येऊ शकते.
५) स्वतःच्या जिभेवर कंट्रोल ठेवा. म्हणजे अशावेळी जर आपण बोललो तर ते दुसऱ्याला हर्ट करणारे असू शकते. जितके आपण यावेळी शांत, स्पीचलेस असू तितकी प्रत्येक गोष्ट नीट होत जाईल.
६) आपल्या भावभावना व्यक्त करा. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती एखादी कंपनी सोडून सोडून दुसरीकडे जाते .जिथे तिला जास्त चांगली पोस्ट मिळालेली आहे. त्यावेळी आधीच्या कंपनीतल्या कलीग ने अभिनंदन करताना सरळच ,”मला तुझा हेवा वाटतो आहे!”असं सांगितलं तर त्या गोष्टी मनात कोंडून राहत नाहीत.
७) एखाद्या कागदावर सरळ आपल्याला ज्यांच्या ज्यांचा हेवा वाटतो त्यांची नावे आणि का वाटतो ? लिहून काढायचे. नंतर हवतर तर तो कागद फाडून टाकायचा, जाळायचा किंवा फ्लश करायचा.
८) रबर बांड टेक्निक . यामध्ये आपल्याला ज्यावेळी अशा भावना निर्माण होतात, त्यावेळी रबर बंड आणखीनच घट्ट करत जायचे. त्यामुळे हा वेडा विचार मनातून घालवायला मदत होईल. कारण घट्ट करताना आपल्याला त्रास होईल, आणि आपोआपच आपण त्या विचारापासून दूर जाण्याचा प्राथमिक ते ने प्रयत्न करू.
९) मेडिटेशन हा एक चांगला उपाय आहे.

यासंदर्भात मंगेशकर कुटुंबियांनबद्दलचे एक उदाहरण मला येथे द्यावेसे वाटते. उषाताई मंगेशकर यांच्या गाण्याचे एक वैशिष्ट्य होते. वेगळ्या धाटणीची गाणी यांनी म्हटली. राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा पिंजरा यातील गाणी यांनी गायलेली आहे. एकदा एका मुलाखतीच्या वेळेला, त्यांना विचारण्यात आले ,सारं कुटुंबच गाण्यात म्हटल्यानंतर आपापसात तुलना होते का ? त्यावर त्या म्हणाल्या की माझी आणि दीदीची तर तुलना होऊच शकत नाही. इतकच काय दीदी आणि इतर कोणीही गायिका यांची देखील तुलना होऊ शकत नाही. आमच्यापैकी प्रत्येकाला आवाजाची एक वेगळी दैवी देणगी लाभलेली आहे. सगळ्या गोष्टी प्रत्येकाजवळ असू शकत नाही . आणि ही गोष्ट हे कुटुंब प्रांजळपणे मान्य करतात. मुख्य म्हणजे प्रत्येक जण आपल्या कारकिर्दीबद्दल समाधानी आहे. त्यामुळे ते कुठेही तुलनेला, मत्सराला थारा न देता आपले काम करत राहिले. आपल्याला यातूनच श्री समर्थांनी श्लोकात सांगितलेल्या मत्सर, द्वेष यापासून दूर जाण्यासाठी वाट नक्की मिळू शकते.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button