नायर हॉस्पिटलच्या ओपीडीत पाणी शिरल्याने रुग्णांचे हाल

Nair Hospital-flooded-following-heavy-rainfall

मुंबई : मुंबईत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबई सेंट्रल परिसरातील नायर हॉस्पिटलच्या (Nair Hospital) ओपीडीत पाणी शिरल्याने रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली . तर सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरुन नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागला .

मुसळधार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे या भागाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि लोकलही पूर्णपणे कोलमडली आहे.

नायर हॉस्पिटल परिसरात गुडघाभर पाणी साचलं. पावसाचं पाणी आत शिरल्यामुळे रुग्णालयातील साहित्य पाण्यावर तरंगतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. नायर रुग्णालय हे कोव्हिड रुग्णालय घोषित करण्यात आले आहे,हे विशेष .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER