नायगाव तालुक्याला सोसाट्याच्या वा-यासह वादळाने झोडपले, तोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान

राजकर्ते व प्रशासन निवडणुकीत गुंग

नायगावबाजार तालुका प्रतिनिधी : परतीच्या पावसाने नायगाव तालुक्यातील सोसाट्यांच्या वा-याने झोडपून हाता तोडांला आलेले उडिद, सोयाबीन सह अन्य पिकांचे आतोनात नुकसान करून होत्याचे नव्हते केले असल्याने दसरा व दीपावली सनावर दुष्काळाचे सावट पसरले आहे.यंदाचे पीक अगदीच जोमात असल्याने शेतकरी कष्टकरी मोठ्या आनंदात असताना रविवारी व त्या आगोदर सतत पडत असलेल्या पावसाने शेतकर्याच्या तोंडांचा घास हिरावला आहे.शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यानां नुकसान भरपाई दयावी अशी मागणी शेतकर्या कडून केली जात आहे.

तालुक्यातील गोळेगाव,कुटूरं, बरबडा,बाहेर,गडगेकर,कहाळा,नरसी भागात मेघ गर्जेना व सोसाट्यांच्या वार्यासह सलग पाउस पडत असल्याने पीक आडवी पडली असून उडिद, मुगाला आता मोडे फुटली आहेत.शेतकर्याचे आतोनात नुकसान झाले असताना त्याची दखल घ्यायला कोणीच तयार नाही कारण राज्यकर्ते आणि प्रशासनाची यंञना निवडणुकीत गुतंलेली असतांना शेतकर्यानां अक्षरश: वार्यावर सोडले आहे.

कुटूरं भागात तर प्रचंड नासधूस झाली आहे , शेकडो झाडे कोलमंडून पडली. रामचंद्र पेदे याचीं गाय गुरे वीज पडून दगावली तर कुटूरं ठाण्याच्या स्वंरक्षण भींतीवर झाड पडल्याने भिंत कोसळली आहे.शेतक्यावर अस्माणी संकट कोसळले आहे.मागील तिन वर्षा पासून दुष्काळाचा मुकाबला करणारा शेतकरी या वर्षीचा खरीप हंगाम दमदार आसल्याने मोठ्या आनंदात होते पण तो आनंद क्षणीक ठरला.शासनाने वेळीच पुढाकार घेऊन दिलासा देने गरजचे आहे.