नागराज येणार तार घेऊन

nagraj Manjule

खरंतर सध्याचा जमाना हा व्हॉट्सॲप , इन्स्टा, फेसबुक अशा सोशल मीडिया वरून संवाद साधण्याचा आहे. सध्या पत्रही क्वचितच पाठवलं जातं तिथे तार करून एखादी गोष्ट कळवण्याचा काळ खरच केव्हाच मागे पडला आहे. पण आजकालच्या या व्हाट्सअप युगात जर आपल्याला एखादी आनंदाची बातमी देणारी तार मिळाली तर? किंवा खाली खुशालीचे पत्र हातात पडलं तर? ती वेगळीच मजा आहे. कारण पत्र या गोष्टी माणसाच्या आठवणीशी जोडलेल्या असतात. पुन्हा पुन्हा त्या वाचता येतात … त्यातले शब्द कुठेतरी भावनांशी जोडलेले असतात. अशीच कालच्या काळातली गोष्ट आजच्या काळात सांगण्यासाठी नागराज मंजुळे येणार आहे. कॅमेराच्या पाठीमागे देखील कमाल करणारा हा दिग्दर्शक अभिनेता म्हणून देखील वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून यापूर्वी पडद्यावर आला आहे. आता पोस्टमनची गोष्ट सांगत नागराज मंजुळे तार नावाच्या शॉर्ट फिल्म मधून पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहे.

खाकी शर्ट, खाकी पॅंट, टोपी खांद्यावर अडकलेली खाकी पिशवी, आणि त्यात पत्रांचा गठ्ठा. त्यावरचा पत्ता वाचून घराघरापर्यंत पत्र पोहोचवणारा पोस्टमन आपल्या प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर नेहमी उभा राहतो. पोस्टमन आला की चेहऱ्यावरील वेगळीच उत्सुकता यायची पण तार आली असं म्हटलं की काळजाचा ठोका चुकायचा. एखादी दुःखद बातमी पाठवायची असली ही पूर्वीच्या काळात लोक तार करत. तेव्हा संवादाची इतकी माध्यमं नव्हती. पोस्टमन आनंदाची बातमी पत्राद्वारे द्यायचा. तो फक्त पत्र देण्यापुरता नसायचा तर ज्या घरात आनंदाची बातमी असायची ते लगेच पोस्टमन च्या हातावर साखर ठेवायचे पण जेव्हा दुःखाची बातमी असायची तेव्हा पोस्टमन पत्रासोबत त्या माणसांना आधार घेऊन यायचा.
असा पोस्टमन बनून नागराज मंजुळे शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पोस्टमन पोस्टमनचा आयुष्याची कथा सांगणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि नागराज मंजुळे लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती. सुरुवातीला नागराज आणि रितेशच्या चाहत्यांना असं वाटलं की रितेश पुन्हा एकदा मराठीत नवा सिनेमा घेऊन येतो की काय. रितेशचे चाहते त्याची वाट पाहत होते. पण या जोडीने शॉर्ट फिल्म या आजच्या लोकप्रिय माध्यमातून तार नावाची कथा मांडायचं ठरवलं . या शॉर्ट फिल्मचा टीजर रिलीज झाला असून त्यामध्ये नागराज पोस्टमनच्या खाकी लुकमध्ये दिसत आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणून जितका कल्पक आहे तितकाच त्याचा अभिनय देखील सहजसुन्दर असल्याचे यापूर्वी आपण पाहिले आहे. नाळ या सिनेमात त्याने सर्वसामान्य कुटुंबातील वडिलांची भूमिका उत्तम निभावली होती .तसेच द सायलेन्स या सिनेमातही नागराजचा अभिनय भाव खाऊन गेला होता. फॅन्ड्री, पिस्तुल्या या सिनेमातून नेहमीच वेगळे कथानक मांडणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या सैराटने कोट्यवधींचा गल्ला बॉक्सऑफिसवर जमवला. या सिनेमातही त्याची छोटीशी भूमिका होती.

रितेश देशमुख याच्या मुंबई फिल्म्स या बॅनरखाली ही शॉर्टफिल्म तयार होत आहे. अर्थात तार घेऊन येणारा नागराज पडद्यावर दिसण्यासाठी पुढचं वर्ष उद्या उजाडणार असलं तरी आतापासूनच त्याविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म या बॅनरखाली आगामी छत्रपती शिवाजी हा सिनेमादेखील नागराज दिग्दर्शित करणार आहे. सध्यातरी नागराजने तार या लघुपट मधील पोस्टमन पाहणाऱ्या प्रत्येकाला आपलासा वाटावा त्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यानिमित्ताने व्हाट्सअपच्या जमान्यात पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनला जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER