नागपूरात ‘ब्लू व्हेल’ गेमने गेला मुलीचा बळी, हात कापून घेतला गळफास

blue whale game

नागपूर :- केंद्र सरकारने भारतात ‘ब्लू व्हेल’ या जीवघेण्या गेमवर आधीच बंदी घातली आहे. देशभरात या गेमच्या आहारी जाऊन अशा प्रकारच्या काही घटना या पूर्वीही घडल्या आहेत. मात्र अनेक साईडवर हा गेम उपलब्ध असल्याने मोबाईलवर सहज खेळला जात आहे. या खेळात शेवटी जो मृत्यूला कवटाळतो तो विजयी होतो. अशीच एक घटना उपराजधानीत उघडकीस आली. ‘ब्लू व्हेल’ या मोबाईलवरच्या जीवघेण्या खेळाने नागपूरात एका 17 वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. मानसी जोनवाल असे या मुलीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मानसीचे वडील एअर फोर्समध्ये हवालदार आहेत. गत तीन महिन्यापासून मानसी ‘ब्लू व्हेल’ गेम खेळत होती. ती या गेमच्या पूर्णतः आहारी गेली होती. मात्र पालकांचे याकडे दुर्लक्ष होते. खेळता-खेळता शेवटचे टास्क पुर्ण करण्यासाठी मानसीने स्वतःचा हात कापून त्यानंतर गळफास घेतल्याचे उघड झाले. पोलिस या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत. नागपुरातील ही पहिलीच घटना असल्याचे समजते.

जगभरात बंदी असलेल्या ‘ब्लू व्हेल’ या गेमने अनेक किशोर वयातील मुलांचा जीव घेतला आहे. 2015 -16 या एका वर्षातच 130 मुलांनी आत्महत्या केली. तर 2016-18 या दोन वर्षात मृतकांचा आकडा दुपटीहून अधिक झाला आहे. 2016 मध्ये एकामागून एक आत्महत्याचे सत्र सुरु असल्याने केंद्र सरकारने भारतात ‘ब्लू व्हेल’ या गेमवर बंदी घातली होती. मात्र अनके साईडवर हा गेम आजही उपलब्ध आहे.