विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात

नागपूर :- आज रविवारी विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महाआघाडी सरकारचे विदर्भातील हे पहिलेच अधिवेशन असेल, हे येथे उल्लेखनीय.

सूत्रांनुसार, नागपूर अधिवेशन फक्त सात दिवसांचेच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान किमान दोन आठवडे अधिवेशन चालविण्याची मागणी विरोधकांतर्फे होण्याचा अंदाज आहे. मात्र, अद्याप अधिवेशनाचा कालावधी स्पष्ट नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी अधिवेशनाच्या तयारीसंदर्भात बैठक घेतली होती. आता कामाची पाहणी करण्यासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईहून विधिमंडळाचे अधिकारी येथे दाखल होणार आहेत. राजकीय जाणकारांनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या अधिवेशनात चांगलाच कस लागू शकतो.

आरे कारशेडचे काम मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीनंतरही सुरुच