नागपूर हादरले : भररस्त्यात गुंडांनी केली एकाची हत्या

Nagpur Murder

नागपूर : उपराजधानी नागपूर (Nagpur) शहर एका हल्ल्याने शनिवारी हादरून गेले. शहरातल्या वर्दळीच्या बोले  पेट्रोल पंपावर (Bhole Petrol Pump) सशस्त्र गुंडांनी एकाची निर्घृण हत्या (Murder) केली. भरचौकात दिवसाढवळ्या हा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे.

आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे. मृताचे नाव बाल्या बिनेकर आहे.  त्याचे गोळीबार चौकात सावजी रेस्टॉरंट आहे. कुख्यात गुन्हेगार म्हणून बाल्याची ओळख होती. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, जुगार तसेच दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी वर्तुळात बाल्याचे अनेक शत्रू आहेत. बाल्या आज त्याच्या आलिशान कारने अमरावती मार्गाने जात असताना बुलेट तसेच एक्टिवावर आलेल्या चार-पाच गुन्हेगारांनी त्याचा पाठलाग केला.

बोले  पेट्रोल पंपाजवळच्या सिग्नलवर कार थांबताच बाल्याला कारची काच खाली करण्यास भाग पाडले. चाकू, कुऱ्हाड आणि इतर धारधार शस्त्रांनी सपासप वार करून त्याला जागेवरच संपवले. बाल्या बिनेकरचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता हे गँगवार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घटना घडली त्या ठिकाणापासून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे घर एक किलोमीटरच्या परिसरातच आहे. त्यामुळे ही घटना घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नागपुरात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांचा धाक राहिला नाही का, असा सवाल विचारण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER