नागपूरकर विद्यार्थीनी ‘फेम्टो’ उपग्रह अवकाशात सोडणार

Femot Satellite & Student

नागपूर : डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या वतीने जागतिक विक्रमाच्या दृष्टीने रामेश्वरम येथून ‘फेम्टो’ उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे. या उपक्रमात मनपाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. जिद्द आणि चिकाटीच्या भरावर या दोन्ही विद्यार्थिनीं नागपूरचे नाव उंचावले आहे. सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेत विज्ञानाचे धडे घेत अंतरिक्षाचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाती मिश्रा व काजल शर्मा या विद्यार्थिनी ७ फेब्रुवारीला उपग्रहांच्या जागतिक विक्रमात सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी त्यांना रामेश्वरम येथे जावे लागणार आहे. कुठल्याही महापालिकेच्या शाळा गरीब आणि गरजू परिवारातील मुलांसाठीच आहेत, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण, यातील विद्यार्थी कुठल्याच स्पर्धेत कमी नाही.

आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठाची गरज आहे. त्यांच्याही डोळ्यात अनेक स्वप्न तरळतात. ती जिज्ञासा हेरण्याची इच्छाशक्तीही आवश्यक आहे. स्वाती आणि काजलने ‘फेम्टो’ उपग्रह तयार केले आहे. हे उपग्रह अंतराळात ३३ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर जाऊन प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेऊन पृथ्वीला पाठवणार आहे. ७ फेब्रुवारीला असे शंभर उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत. महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह अन्य अधिकारी व शिक्षकांकडून दोघींना कौतुकाची थाप आणि आशीर्वाद देण्यात आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER