नागपूर : २६ नोव्हेंबरपासून ग्रामीण भागातील शाळा होणार सुरू; तयारी जोरात

School

नागपूर :  जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. प्रशासन प्रत्येक शाळेची पाहणी करत आहे. २६ नोव्हेंबरपासून ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार आहेत. (Rural Schools Open In Nagpur From November 26; Strong Preparation Administration) शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याचे ‘थर्मल स्क्रिनिंग’ होणार आहे. दरम्यान, ३६ पेक्षा जास्त शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

ग्रामीणमध्ये ९ ते १२ साठी ५५७६ शिक्षक आहेत. सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. नागपूरच्या ग्रामीण भागात ५० टक्के विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची साधने  नाहीत. त्यामुळे ९ वी ते १२ वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासन शाळा सुरू करण्याची तयारी करत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश ऐच्छिक राहील. जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांची गैरहजर म्हणून नोंद केली जाणार नाही.

त्यामुळे कोविडच्या काळात ज्यांना गरज आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यांत संभ्रम आहे. शाळा उघडण्याला स्थगिती देण्यात आली आहे. सोलापूर, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, उस्मानाबादसह २२ ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत.

सर्वाधिक २० शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतरही श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर  सॅनिटायझर दिले जात होते. विद्यार्थी मास्क घालून आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४८१ शाळांत  ७० शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER